Vidhan sabha election 2024 : “बाह्य विधानसभा: तिरंगी लढत आणि बदलणारी राजकीय समीकरणे”

"bhyushe-advay-hire-bandookaka-bachhav-bahya-vishay-samarthan

नाशिक जिल्ह्यातील बाह्य विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव गट) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असून विद्यमान आमदार आणि राज्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि त्यांच्याविरुद्ध उभे राहणारे अद्वय हिरे यांच्यातील ही स्पर्धा चर्चेचा विषय बनली आहे. अद्वय हिरे हे शिंदे गटाच्या विरोधात जोरदार प्रचारात आहेत आणि भुसे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करत आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अद्वय हिरे हे हिरे कुटुंबातील आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या मतदारसंघावर पारंपरिक प्रभाव आहे. त्यांच्या कुटुंबाने अनेक वर्षांपासून इथे निवडणुका लढवल्या असून, त्यांना मतदारसंघात एक खास ओळख मिळाली आहे. हिरे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा मतदारसंघ काबीज करण्याची तयारी केली आहे आणि अद्वय हिरे यांनी शिंदे गटाला कडवे आव्हान देण्याची तयारी केली आहे.

या लढतीत आणखी एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे बंडूकाका बच्छाव, हे एकेकाळी दादा भुसे यांचे जवळचे सहकारी होते. बच्छाव यांची स्वतंत्र उमेदवारी तसेच ते अपक्ष लढणार की अन्य कोणत्या पक्षाकडून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बच्छाव यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भुसे, हिरे आणि बच्छाव यांच्यातील स्पर्धेमुळे मतदारसंघात तिरंगी लढत निर्माण होणार आहे.

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे सध्या केंद्रस्थानी आहेत. मालेगाव जिल्हा निर्मितीचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. नार-पार योजना, मांजरपाडा-२ प्रकल्प अद्यापही प्रत्यक्षात येऊ शकलेले नाहीत. जिल्हा बँक प्रकरणात अद्वय हिरेंवर करण्यात आलेली कारवाई, नेत्यांची बदलती भूमिका यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दादा भुसे हे बाह्य मतदारसंघात पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी मतदारांमध्ये कायमस्वरूपी स्थान निर्माण केले आहे, मात्र विरोधकांकडून आलेल्या आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे.