मोठी बातमी! नाशिकमध्ये आज भाजपचा मेगा प्रवेश सोहळा

Big news! BJP's mega entry ceremony in Nashik today

बडगुजर, गीते, घोलप पिता-पुत्रांसह अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल होणार (मोठी बातमी)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक – आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) मोठा मेगा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. मंगळवारी (17 जून) भाजपमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांतील अनेक मातब्बर नेते सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवेश सोहळ्याचे ठळक मुद्दे: (मोठी बातमी)

  • उबाठा गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये पुनरागमन.
  • माजी सभापती गणेश गीते यांचाही पुनर्प्रवेश.
  • माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप भाजपमध्ये.
  • 15 ते 20 माजी नगरसेवकांचा सामावेश अपेक्षित.

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार इनकमिंग

विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार, तसेच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर, विविध पक्षांतील नेत्यांची भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाली आहे.

पहिल्यांदा बडगुजर आणि गीते यांच्या प्रवेशाला स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांकडून विरोध करण्यात आला होता. मात्र कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समेट साधल्यामुळे हा विरोध आता निवळला आहे आणि आज अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत.

भाजपा पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेवर लक्ष

कोणत्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, हे निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. येत्या आठवड्यात आणखी काही मोठे चेहरे भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून स्वबळाची तयारी, महायुतीतही वर्चस्वाची भूमिका

महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीचा भाग असला तरी पक्षाकडून स्वबळाची तयारी सुरू आहे. कुंभमेळा, महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या पार्श्वभूमीवर भाजपची सत्ता आणखी मजबूत करण्याचे धोरण आहे. त्यामुळे इतर पक्षातील प्रभावशाली नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे.

नाशिकमधील राजकारणात गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक मानली जाते आणि त्यांच्या पुढाकारातूनच हे प्रवेश घडून येत आहेत.

आज भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संभाव्य यादी (नाशिक):

  • सुधाकर बडगुजर – माजी नगरसेवक
  • बबन घोलप – माजी मंत्री
  • नयना घोलप – माजी महापौर
  • अशोक मुर्तडक – माजी महापौर
  • दिलीप दातीर – माजी नगरसेवक
  • अशोक सातभाई – माजी नगरसेवक
    … तसेच 15 ते 20 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये होणार सामील.