Nashik Igatpuri Accident News
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik Accident Update: नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. उद्घाटनाच्या अवघ्या तीन दिवसांतच इगतपुरी टनेलमध्ये शनिवारी (७ जून) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एक कार कंटेनरला पाठीमागून धडकली, ज्यामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, स्थानिक महामार्ग पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं.
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात – लोकांची चिंता वाढली
हा अपघात नाशिकच्या इगतपुरी टनेल परिसरात घडला असून, विशेष म्हणजे याच दिवशी इतर दोन ते तीन वाहनांचेही अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र टोलनाका प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे दिवसभरात नेमके किती अपघात झाले, याचा अधिकृत आकडा मिळू शकलेला नाही.Nashik Accident
अपघातग्रस्तांना तातडीने उपचार
महामार्ग पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवलं. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
सावधगिरीचा इशारा:
समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रकारांमुळे अपघात वाढत आहेत. वाहनचालकांनी मार्गावर अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
आपत्कालीन सेवा:
अपघात किंवा आणीबाणीच्या प्रसंगी 112 किंवा 108 वर त्वरित संपर्क साधा.