Devayani Farande BJP : नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी भाजपा आक्रमक – पोलीस आयुक्तांना निवेदन

BJP nevedan

गंगापूर रोड, कॉलेज रोड, वडाळा आणि इंदिरानगर परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाईची मागणी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक – कायदा-सुव्यवस्थेसाठी भाजपा शिष्टमंडळाचा पुढाकार

BJP: नाशिक शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या क्लब, हॉटेल, बियर बार, पान स्टॉल आणि स्पा यांसारख्या व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी भाजपा शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. BJP आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गंगापूर रोड, कॉलेज रोड, वडाळा, इंदिरानगर आणि द्वारका परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची मागणी केली.

शहरातील युवक-युवती नशेच्या आहारी – कायद्याची पायमल्ली

शहरातील अनेक हॉटेल्स, गार्डन आणि पार्क हे नशेच्या अड्ड्यांमध्ये रूपांतरित झाले आहेत. यामुळे तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असून, पोलीस प्रशासनासोबतही गैरवर्तन आणि मुजोरीचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी गंगापूर रोडवर घडलेल्या घटनेमुळे या समस्येचे गांभीर्य अधोरेखित झाले.

पोलीस पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याची मागणी

भाजपाच्या(BJP) शिष्टमंडळाने शहरातील सीसीटीव्ही लगेच कार्यान्वित करावेत तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. शहरात अनधिकृत बांधकामे करून चालवली जाणारी हॉटेल्स आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय तात्काळ बंद करावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

शिष्टमंडळातील प्रमुख उपस्थिती:

भाजपा (BJP)आमदार देवयानी फरांदे, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, सरचिटणीस सुनील केदार, गिरीश पालवे, काशिनाथ शिलेदार, ॲड. श्याम बडोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिककरांसाठी महत्त्वाचे पाऊल

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी भाजपाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधूनही होत आहे.

He Pan Wacha: MD Drugs : सांगली ‘एमडी ड्रग्ज’ हब? 700 कोटींचा साठा जप्त, मोठे तस्कर गजाआड!