Chhava Movie Tax Free : ‘छावा’ चित्रपटाची तुफान लोकप्रियता: महाराष्ट्रात करमुक्त होणार का?

Chhava Movie Tax Free

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhava Movie Tax Free)वर प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhava Movie) या ऐतिहासिक चित्रपटाने महाराष्ट्रात तुफान गाजत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा साकारणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत. यामुळे राज्यात ‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Chhava Movie Tax Free : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान

या मागणीवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले. त्यांनी चित्रपट निर्मात्यांचे अभिनंदन करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सत्यता राखून सादर केल्याबद्दल कौतुक केले.

“मला आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सत्यतेने मांडणारा एक उत्कृष्ट चित्रपट तयार झाला आहे. यासाठी मी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि विकी कौशल यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” – देवेंद्र फडणवीस

Chhava Movie महाराष्ट्रात करमणूक कर नाही!

चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर बोलताना फडणवीस म्हणाले:

“इतर राज्यांमध्ये करमणूक कर माफ केला जातो. मात्र, महाराष्ट्रात २०१७ पासून करमणूक कर रद्द केला आहे. त्यामुळे ‘छावा’ चित्रपट (Chhav Movie) करमुक्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, चित्रपटाच्या प्रचारासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार योग्य ते प्रयत्न करेल.

अपमान करणाऱ्यांना माफ नाही!

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या अभिनेत्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस स्पष्टपणे म्हणाले:

अपमान करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू. सरकार आणि शिवप्रेमी अशा कोणालाही माफ करणार नाहीत.”

छत्रपतींमुळे आम्ही आहोत: फडणवीस

आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या.

“छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. त्यांनी आम्हाला आत्माभिमान, आत्मतेज आणि समतेचा संदेश दिला. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.” – देवेंद्र फडणवीस

‘छावा’ चित्रपटाबद्दल उत्साह वाढतच चालला

छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. महाराष्ट्रात करमणूक कर नसल्यामुळे ‘छावा’ला करमुक्त करण्याची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले असले तरी, या चित्रपटाच्या यशाने ऐतिहासिक चित्रपटांना नवी उभारी मिळाली आहे.