नाशिकच्या विकासासाठी मोठा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadnavis)यांनी बुधवारी जाहीर केले की, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांना विकासात्मक कामांचे नियोजन करण्यासाठी शासकीय जमीन विनामूल्य देण्यात येईल. तसेच, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जागा राखीव ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
CM Fadnavis नाशिकसाठी “स्पिरीच्युअल सिटी” संकल्पना
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस(CM Fadnavis) यांनी “स्पिरीच्युअल सिटी” उभारणीसाठी आवश्यक ती जमीन संपादित करण्याचे निर्देश दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत नाशिकसह पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या योजनांवर चर्चा करण्यात आली.
महानगर प्रदेश विकास आराखड्यासाठी महत्त्वाचे निर्णय
१. रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास
- नवीन शहर नियोजन करताना १८ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित करावेत.
- भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पायाभूत सुविधांचा समावेश करावा.
२. पाणीपुरवठा आणि मलनिःस्सारण योजना
- नागरिकांसाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत.
- सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जागा राखीव ठेवावी.
३. डिजिटल सुविधा आणि संकेतस्थळ विकास
- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे.
- नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा पुरवाव्यात.
४. टप्प्याटप्प्याने विकास योजना
- पहिल्या टप्प्यात: रस्ते, मलनिःस्सारण, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, स्मशानभूमी, दफनभूमी इत्यादींचा समावेश.
- दुसऱ्या टप्प्यात: इतर आवश्यक सुविधा विकसित कराव्यात.
पुण्यासाठी “ट्वीन टनल” भुयारी मार्ग
मुख्यमंत्री फडणवीस (CM Fadnavis)यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग “ट्वीन टनल” तंत्रज्ञानावर आधारित करण्याचे निर्देश दिले.
महत्त्वपूर्ण मंजुरी आणि निधी वाटप
- पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यासाठी: ₹६३६.८४ कोटी
- रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्ते: ₹२०३ कोटी
- “अर्बन ग्रोथ सेंटर” रस्ते विकासासाठी: ₹१,५२६ कोटी
नाशिकच्या विकासाचा वेग वाढणार
या निर्णयांमुळे नाशिक महानगर प्रदेशाचा विकास गतीमान होणार असून, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नाशिकला “स्पिरीच्युअल सिटी” म्हणून विकसित करण्याच्या दिशेने ही महत्त्वपूर्ण पाऊले आहेत.
He Pan Wacha : Devayani Farande BJP : नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी भाजपा आक्रमक – पोलीस आयुक्तांना निवेदन