Fake Note Printing : दिंडोरीत बनावट नोटा छापण्याचा उद्योग उद्ध्वस्त; तिघांना अटक

a stack of money with red circle and text

Fake Note Printing

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

दिंडोरी शहरातील आश्रय लॉजच्या एका खोलीत सुरू असलेला बनावट नोटा छापण्याचा उद्योग Fake Note Printing पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी प्रिंटर व मोबाईल असा वीस हजार 744 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे.

दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉज मधील रूम नंबर 203 मध्ये बनावट नोटा Fake Note Printing तयार केला जात असल्याची गुप्त माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने या ठिकाणी छापा टाकत तिघांना अटक केलीआहे,तसेच घटनास्थळावरून नोटा छापण्यासाठी पेपर, बनावट चलनी नोटा व प्रिंटर असा 20 हजार 744 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलिसांनी किरण दशरथ माळेकर, ज्ञानेश्वर सदू गायकवाड, व अनिल बाळू माळेकर यांना अटक केली या तिघांनी यापूर्वीही बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांना मदत करणारे व त्यांचे कडून नोटा घेणाऱ्याची पोलिसांकडून तपास सुरू आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करत आहेत.

वारंवार बनवेगिरीची प्रकरणे उघड होऊनही उद्योग सुरूच

15 सप्टेंबर 2021 रोजी सुरगाणा तालुक्यात पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह सात जणांना अटक केली होती त्यांच्याकडून बनावट नोटांसाठी वापरलेले प्रिंटर कम्प्युटर कार व इतर साहित्य असं शंभर रुपयांच्या नोटांचे पाठोपाठ छपाई केलेले 177 कागद पाचशे रुपयांची छपाई केलेली 256 कागद जप्त केले होते

2 जानेवारी 2017 रोजी आडगाव पोलिसांनी हॉटेल जत्रा समोर तीन आलिशान कार मधील अकरा संशयकाकडून तब्बल एक कोटी पस्तीस लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या

2024 च्या निवडणुकीदरम्यान अंबड पोलिसांनी तिघांना अटक करत पाचशे रुपयांच्या 30 बनावट नोटा तर शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने मुक्तिधाम परिसरातून दोन महिलांना अटक करत पाचशे रुपयांच्या 20 बनावट नोटा जप्त केल्या होत्या

He Pan Wacha: Nashik gramin bhagat matdanacha utsah shahari bhagapeksha adhik