शुक्रवार, 10 जानेवारी 2025. पौष शुक्ल एकादशी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12
“आज दुपारी 2 नंतर चांगला दिवस आहे. पुत्रदा एकादशी
आजचे राशिभविष्य आणि
10 जानेवारी रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर रवी आणि शनि या ग्रहाचे वर्चस्व आहे.
कल्पकता, चपळता, उत्साह कला व हुशारी हे तुमचे खास गुण आहेत. निसर्गाशी तुम्ही सहज एकरूप होतात. शनी ग्रहामुळे काहीसे साशंक वृत्तीचे असून निर्णय घेण्यास उशीर लावता .तुमचे व्यक्तिमत्व दुसऱ्याला आकर्षण घेणारे आहे .तुमच्या ज्ञानामुळे व बुद्धिमत्तेमुळे इतरांच्या मनात आदराची भावना असते .वडील, सासरे बायको, आई इत्यादी नातेवाईकांमुळे आर्थिक फायदे होतात. वयाच्या 46 व्या वर्षापासून तुम्हाला यश मिळते. नोकरी चांगल्या पदावर असतात धंद्यात सुद्धा यश मिळते .तुमच्याकडे प्रामाणिकपणा व आत्मविश्वास असतो .तुमची प्रकृती सशक्त असते, आजारपणा तुम्ही लवकर बरे होतात .इतरांना तुम्ही चाकोरी बाहेर जाऊनही मदत करतात पण तसे सहकार्य तुम्हाला इतरांकडून मिळत नाही, बहुतेक वेळा नातेवाईकांच्या बाबतीत ही गोष्ट आढळते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असतात. तुम्ही उत्तम परिपूर्ण सहचरणी असून बुद्धिमान जुळवून घेणाऱ्या कुशल असतात. तुमच्या मैत्रीपूर्ण वर्तनामुळे तुमचे घर म्हणजे सामाजिक केंद्रच असते. तुम्हाला अनेक गोष्टीत रस असतो, त्यामुळे तुमचा नवरा त्याचा वेळ कशात खर्च करतो हे पाहायला तुम्हाला फुरसत नसते .दुसऱ्याला दुखी करण्यापेक्षा स्वतःचे दुःख स्वतःजवळ ठेवलेच पसंत करतात. तुम्ही जात्याच हुशार असून बुद्धिमान असतात. नवऱ्याकडून योग्य ती संधी तुम्हाला दिली जाते त्यामुळे तुमचे कौतुक होते. तुमच्या सौम्य स्वभावामुळे तुम्ही लोकांना आपल्याकडे आकर्षून घेता व मानाचे स्थान मिळवता.
शुभ रंग-सोनेरी,पिवळा
,जांभळा
शुभ दिवस-रविवार, बुधवार, गुरुवार
शुभ रत्न-माणिक,पन्ना,चंद्र मणि
आजचे राशिभविष्य
मेष:- आज कौटुंबिक वातावरण चांगले राहील.वाहन सौख्य लाभेल.खर्च होईल.
वृषभ:- आज वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल.
कलाकारांना चांगला.
मिथुन:- आज व्यय स्थानी चन्द्र आहे.धार्मिक कार्या वर खर्च होईल.आर्थिक लाभ होतील.रुटीन चालू ठेवा.
कर्क:- आज लाभ स्थानी चन्द्र आहे.. संतती व पती कडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. आज उत्तम भोजन व वैवाहिक सौख्य मिळेल.
सिंह:- आज कामात लाभ मिळेल.बढती,बदली होऊ शकते. कामाच्या ठिकाणी शाबासकी ,कौतुक होइल.
कन्या:- आज धार्मिक सहली घडू शकतात. उच्च शिक्षणात यश मिळेल.मानसिक स्वास्थ्य लाभेल.
तुळ:- आज प्रिय व्यक्ती भेटतील. आरोग्य जपा. हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो.मोजके बोला.
वृश्चिक:- आज स्वतःसाठी वेळ द्याल.वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.पाण्याच्या जवळ पर्यटन घडेल.
धनु:- छान बातमी मिळेल.धनलाभाची शक्यता राहील.आरोग्य सुदृढ राहील.सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल.
मकर:- आज संतती कडून आनंद देणारी बातमी मिळेल.मंत्रासिद्धी प्राप्त होईल.शेअर्स मध्ये अनपेक्षित लाभ होईल.
कुंभ:- आज कामात व्यस्त रहाल.धावपळ दगदगी चा दिवस.येणी वसूल होतील.कौटुंबिक वाद संपुष्टात येतील.सामाजिक कार्यातून मानसन्मान मिळेल.
मीन:- आज कलाप्रांतात सृजनशीलता दिसून येईल. छोटे प्रवास होतील.नवीन ओळखी होतील.नात्यात गैरसमज टाळा.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाईल-9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.