Delhi : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी भाजपाची बैठक, शपथविधीची तारीख ठरली?

Delhi mukhymantri

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपाने ४८ जागांवर विजय मिळवला असून, आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. आता भाजपाचे सरकार स्थापन होणार असले तरी मुख्यमंत्री पदावर कोणाची निवड होणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Delhi मुख्यमंत्री कोण होणार? १७ फेब्रुवारीला होणार भाजपाची मोठी बैठक

मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा होत असून, परवेश वर्मा, आशीष सूद आणि रेखा गुप्ता यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच, भाजपाने महिलेला मुख्यमंत्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Delhi शपथविधी कधी होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवडीनंतर दिल्ली सरकारचा शपथविधी १८ किंवा १९ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. भाजपाचे सर्व ४८ नवनिर्वाचित आमदार दिल्ली (Delhi) भाजपाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

दिल्लीच्या नव्या सरकारमध्ये कोणते मंत्री?

नव्या सरकारमध्ये १५ आमदारांना प्रमुख मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद नसेल, असे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या निवडीसाठी वरिष्ठ भाजप नेत्यांची बैठक होणार आहे.

दिल्लीच्या सत्तास्थापनेच्या वाटचालीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

दिल्लीच्या सत्तास्थापनेसाठी भाजपाने पूर्ण तयारी केली असून, आता मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १७ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय स्पष्ट होईल.