धनगर आरक्षण विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन.

dhangar samaj andolan

धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आदिवासी संघटनेच्या वतीने लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
बोगस हटाव आरक्षण बचाव,
बच्चे बच्चे को सिखाना है आदिवासी बचाना है, उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो, जल जंगल जमीन आमच्या हक्कची नाही कुणाच्या बापाची, अश्या आशयाचे पोस्टर दाखवत निषेध करण्यात आला. व महायुती सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या लाक्षणिक निषेध आंदोलनात आदिवासी रावण फाउंडेशन, आदिवासी उलगुलांन सेना, राघोजी क्रांती सेना, वारली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बिरसा ब्रिगेड, आदिवासी बचाव अभियान नाशिक, कणसरा मित्र मंडळ नाशिक, जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक या संघटना सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनात प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, सोनिराम गायकवाड, दत्तू झनकर, मुनाफ तडवी, गणेश आहेर, राहुल गावित, के. के.गांगुर्डे, गीतेश्वर खोटेरे, जयवंत गारे, वसंत राऊत, शारदाताई प्रतीके, जयश्री गावित, लतिका पवार,संगीता कराटे, विठाआक्का पवार, अनिता बागुल, सुनीता गवळी, आदिवासी समाजातील नेते, महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Leave a Reply