येवल्यात पतंगप्रेमींवर ड्रोनची नजर नॉयलॉन मांजांचा वापर रोखण्यासाठी उपाययोजना

IMG 20250105 162553

येवला : नॉयलॉन. मांजावर बंदी असतांनाही सर्रासपणे दरवर्षी विक्री आणि वापर होत असताना वावर्षीही पाच जण गंभीर जखमी झालेले असताना प्रशासनही आता कुठे मोडवर चेत आहे. गेल्या आठवड्यात शहरात नॉयलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत नॉयलॉन मांजा जप्त केला. यानंतर आता प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून नॉयलॉन मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर आता ड्रोन कॅमेराने नजर ठेवली जावून पालकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रांत बाबासाहेब गाढवे यांनी दिला आहे. नॉयलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्या पतंग प्रेमींवर प्रशासन आता ठोस कारवाई करणार आहे. ६ जानेवारी रोजी शहरातून महसूल, पोलीस, पालिका प्रशासन यांच्या वतीने नविलॉन मांजाच्या वापर आणि विक्री विरोधात रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत समात्तसेवी नागरिक, संघटना, विद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक सामील होणार आहेत. या जीवघेण्या मांजामुळे नागरिकांचे आणखी जीव जाऊ नयेवा गंभीर जखमी होऊ नये, पक्षी आणि प्राण्यांचे जीष सुरक्षित राहावे हा हेतू प्रशासनाचा आहे. प्रशासनातर्फे ६ जानेवारीपासूनदारोय तीन ड्रोन कॅमेराने नजर ठेवली जाणार असून ज्यांनी हा मांजा खरेदी केला आहे. त्यांनी स्वच्योंने हा घरातून चार आणावाअसे आवाहन प्रशासनाने केले. या मांजाची होळी करण्यात येणार असल्याची माहिती प्रांत गाढवे यांनी दिलीकडक कारवाईचा पोलिसांचा इशारामकर संक्रांत सन काही दिवसांवर येवून ठेपला असून पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणान्यांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे नायलॉन मांजा संदर्भात पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांजाची विक्री होत असलेल्या येवला शहरातील अनेक छुष्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे आणि आता तर नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या वर तसेच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई कराण्थाचा इशारा पोलिस निरीक्षक महाजन वांनी दिला आहे पंतग तद्धविण्यासाठी नागरिकांनी साध्या मांजाचा वापर करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांनी केले

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.