E-KYC अपडेट | नाशिक जिल्ह्यातील ९९.९८% शिधापत्रिकाधारकांची नोंदणी पूर्ण, ६१९ लाभार्थींची ई-केवायसी बाकी

mbcMarathi E-KYC of Ration Card Holders

Nashik Ration Card News | राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया अंतिम टप्प्यात

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक E-KYC अपडेट – केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (NFSA) लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया नाशिक जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आली आहे. ३८.७० लाख लाभार्थ्यांपैकी ३८.७० लाख १५१ जणांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, केवळ ६१९ लाभार्थींची नोंदणी शिल्लक असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

चार वेळा मुदतवाढ मिळूनही काहींची नोंदणी बाकी

मागील वर्षभरात आधार नोंदणीसाठी शासनाने चार वेळा मुदतवाढ दिली होती. सरकारने निर्देश दिले होते की, ३१ मे २०२५ पर्यंत शंभर टक्के नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शासनाकडून वारंवार आवाहन करूनही काही लाभार्थी ई-केवायसीसाठी पुढे आले नाहीत, त्यामुळे आता त्यांच्या अन्नधान्य पुरवठ्यावर प्रभाव होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील आधार नोंदणी

नाशिक (धाविअ)- ४,३३,099,
मालेगाव (धाविअ)- २,८३,१0३,
नांदगाव- १,८9,८१३,
सुरगाणा- १,४१,१9६,
इगतपुरी- १,७६,५9७,
निफाड- ३,५७,६५७,
बागलाण- २,७9,११४,
येवला- १,90,८90,
चांदवड- १,८२,५५9,
देवळा- १,१८,0४८,
दिंडोरी- २,४४,१६४,
कळवण- १,६६,११६,
मालेगाव- ३,09,५८७,
नाशिक- ३,१५,09८,
पेठ- १,१२,0३9,
सिन्नर- २,३9,२9६,
त्र्यंबकेश्वर- १,३१,७७५

अन्नधान्य लाभावर परिणाम होण्याची शक्यता

जिल्ह्यात ८.९८ लाख रेशन कार्ड धारक असून, एकूण ३८.७० लाख लाभार्थ्यांपैकी फक्त ६१९ जणांची नोंदणी अपूर्ण आहे. शासनाने यापूर्वी स्पष्ट केले होते की ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना धान्याचा पुरवठा थांबवण्यात येईल. त्यामुळे या ६१९ लाभार्थ्यांचे भवितव्य लवकरच स्पष्ट होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील ९९.९८% ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ काही लाभार्थींची नोंदणी बाकी आहे. शासनाच्या नव्या धोरणांनुसार, आता शिल्लक लाभार्थ्यांच्या धान्य वितरणावर बंदी येऊ शकते. लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.