Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत सहकुटुंब कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी देवीच्या आशीर्वाद घेतल्याचे सांगितले. शिंदे यांनी दर्शनानंतर आपला आनंद व्यक्त करत, “कामाख्या देवीचे दर्शन घेऊन खूप आनंद झाला. इथून प्रेरणा घेऊन आम्ही जनतेची सेवा केली आहे,” असे त्यांनी म्हटले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिंदे यांची दोन वर्षांपूर्वीही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला भेट झाली होती, याची आठवण करून दिली. “आम्ही जे बोलतो ते करतो, त्यामुळे जनतेला आमच्यावर विश्वास आहे,” असेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी देवीचे दर्शन घेऊन पुढील लढाईसाठी आशीर्वाद घेतले आहेत. २४ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करून ते निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतील.