नाशिक | १० जून २०२५
ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार का? अशा चर्चांना आता अधिक बळकटी मिळाली आहे. कारण एकाच आठवड्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली, आणि आज ते खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत!
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिंदे गटात विलास शिंदे यांचा प्रवेश?
- गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराजीचे वारे वाहत असून, अनेक नेते शिंदे गटात प्रवेशाच्या तयारीत आहेत.
- नाशिकचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे त्यातले एक प्रमुख नाव मानले जात आहे.
- रविवारी गंगापूर रोडवर थेट रस्त्यावरच शिंदे यांचं वाहन अडवून त्यांनी स्वागत केलं, यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
सुधाकर बडगुजरांवर थेट हल्लाबोल!
विलास शिंदे यांनी शिवसेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर थेट आरोप करत म्हटले:
“सर्व पदं बडगुजर यांनाच दिली जातात, इतर कार्यकर्त्यांना डावललं जातं. आम्ही नाराज होतो, पण कधी बोललो नाही.“
या विधानामुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद अधिकच स्पष्ट झाले आहेत.
राजकीय नव्हे, फक्त शुभेच्छा भेट – एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण
विलास शिंदे यांच्या कन्येच्या लग्नाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले:
“मी केवळ लग्नासाठी गेलो होतो. त्यांनी भेट घेतली, यामागे राजकीय अर्थ लावू नका.“
आज संजय राऊत – विलास शिंदे महत्त्वपूर्ण भेट
आज संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर विलास शिंदे यांचा पुढील राजकीय निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात हे संकेत मानले जात आहेत की, विलास शिंदे लवकरच शिंदे गटात प्रवेश करु शकतात.
Vilas Shinde Shiv Sena
, Vilas Shinde Shinde Ghat
, Vilas Shinde Sanjay Raut
, Shiv Sena Nashik Politics
, ठाकरे गट नाराजी
, विलास शिंदे एकनाथ शिंदे भेट
, नाशिक राजकारण
, शिवसेना फूट
, Sanjay Raut Meeting
, Sudhakar Badgujar Controversy