Heart Attack News | Nashik Road : सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; शाळेच्या गेटमधून प्रवेश करताना कोसळली

download 57 1

Nashik News | Heart Attack In School Campus | Heart Attack News
नाशिकरोड : नाशिकरोड परिसरातील सेंट फिलोमिना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणाऱ्या सहावीतल्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) घडली.

श्रेया किरण कापडी (वय ११, रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सकाळच्या सुमारास ती शाळेच्या गेटमधून प्रवेश करत असताना अचानक चक्कर येऊन ती मैदानावर कोसळली.

शिक्षकांनी तातडीने लक्ष देत तिला नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला.

श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून, तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अचानक जाण्याने शाळेत हळहळ व्यक्त केली जात असून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये शोककळा पसरली आहे.