भुसावळ – प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद करण्यासाठी आणि विभागाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी भुसावळ रेल्वे Indian Railway विभागाने तीन महत्त्वाचे उपक्रम सुरू केले आहेत. या बदलांमुळे स्थानकांच्या व्यवस्थापनात मोठा सकारात्मक बदल घडून येणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
लासलगाव स्थानकावर प्रवाशांना अधिक स्वच्छ आणि आरामदायी सेवा देण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. विश्रामगृहे, पे-अँड-पार्क, आणि कॉफी हाऊस यांसारख्या सुविधा आता खासगी ठेकेदारामार्फत व्यवस्थापित केल्या जातील. या निर्णयामुळे रेल्वेला दरवर्षी ₹४०,००० नफा मिळणार असून, व्यवस्थापन खर्चात २५% कपात झाली आहे.
Indian Railway : नाशिक रोड स्थानकाचा नव्या लूकसह कायापालट
नाशिक रोड स्थानक आता नव्या स्वरूपात झळकणार आहे.बँक ऑफ महाराष्ट्रसोबत जाहिरात कराराद्वारे स्थानकावर १३ ग्लो साईन बोर्ड्स लावण्यात आले आहेत.
या बोर्ड्सवर स्थानिक पर्यटनस्थळांची माहिती आणि प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना झळकतील. या उपक्रमामुळे रेल्वेला ₹९०,००० परवाना शुल्क मिळाले असून स्थानकाचा आकर्षक लूक प्रवाशांना भुरळ घालेल.
- कुंभमेळ्यासाठी ‘कुंभ अॅप’ची सुविधा
कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन आणि प्रवाशांना त्वरित माहिती देण्यासाठी डिजिटल सोयींचा समावेश केला गेला आहे.स्मार्ट अॅपद्वारे वर्च्युअल नकाशा, प्रवास सुविधा, आणि जलद सेवा उपलब्ध असणार आहे.या नव्या तंत्रज्ञानामुळे लाखो भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
स्वच्छ, सुंदर, आणि आधुनिक सोयींनी सज्ज स्थानके.कुंभमेळ्यासाठी डिजिटल आणि जलद सेवा.प्रवाशांसाठी उच्च दर्जाचा सेवा अनुभव आणि वेळेची बचत होणार आहे.
He Pan Wacha : Nashik Road: “डीआरएम इती पांड्ये यांचा घोटी-मनमाड रेल्वे मार्गाचा आढावा, प्रवासी सुविधांसाठी सुधारणा होणार”