जेद्दाह (सौदी अरेबिया): इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ चा दोन दिवसांचा मेगा लिलाव रविवार, २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या लिलावासाठी ५७७ खेळाडूंची नावे यादीत असून त्यापैकी २०४ खेळाडूंना संघ मिळण्याची शक्यता आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, आणि श्रेयस अय्यर यांसारख्या मोठ्या खेळाडूंवर कोण किती रक्कम लावणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
सर्वाधिक पर्स:
टीम पंजाब: ११०.५० कोटी
टीम बंगळुरू: ८३ कोटी
टीम लखनौ आणि गुजरात: ६९ कोटी
टीम मुंबई व हैदराबाद: ४५ कोटी
या मेगा लिलावात कोणते संघ कोणत्या खेळाडूंना आपल्याकडे खेचतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे