IT Park in Nashik – राजूर बहुला एमआयडीसीत IT पार्कसाठी 25 एकर जागा निश्चित – उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

IT Park in Nashik - 25 acres of land has been allocated for IT Park in Rajur Bahula MIDC - Big decision of Industries Minister Uday Samant

IT Park in Nashik | Rajur Bahula MIDC | Uday Samant News | Nashik Industrial Development | Nashik IT Hub

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक : जिल्ह्यातील राजूर बहुला एमआयडीसी परिसरात आयटी पार्क स्थापन करण्यासाठी २५ एकर जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे नाशिकमध्ये आयटी क्षेत्राचा विकास वेगाने होण्याची शक्यता आहे.

राजूर बहुला IT पार्कसाठी जागेचे नियोजन

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात MIDC आढावा बैठक पार पडली. यामध्ये विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मंत्री सामंत यांनी सांगितले की,

  • राजूर बहुला येथे MIDC कडून २५ एकर व महानगरपालिकेकडून १५ एकर जागा IT पार्कसाठी देण्यात येईल.
  • IT कंपन्यांना आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग, MIDC आणि मनपा संयुक्तरित्या काम करणार आहेत.

कुंभमेळा आणि औद्योगिक प्रदर्शन केंद्र

आगामी कुंभमेळा २०३६ लक्षात घेऊन, साधूग्राम परिसरात स्थायी औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी आराखडा सादर करण्याचे निर्देशही मंत्री सामंत यांनी दिले.

  • ११ वर्षे प्रदर्शन केंद्र वापरले जाईल, आणि १२ व्या वर्षी ती जागा कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडे दिली जाईल.
  • याशिवाय, देशभरातून येणाऱ्या उद्योजकांसाठी टेंट सिटी उभारण्याचेही नियोजन केले जात आहे.

उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय

मंत्री सामंत यांनी खालील मुद्द्यांवरही निर्देश दिले:

  • सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर
  • सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १२ कोटींचा निधी
  • विना व्यत्यय वीजपुरवठ्यासाठी वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण
  • अग्निशमन कराचा प्रश्न MIDC आणि मनपा एकत्रितपणे सोडवणार
  • जिल्हा उद्योग समिती अंतर्गत उपसमित्यांची स्थापना – उद्योजकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याचा निर्णय

बैठकीत उपस्थित मान्यवर

या आढावा बैठकीस आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, MIDC प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, तसेच निमा, आयमा, आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी उपस्थित होते.