Maharashtra Weather : होळीपूर्वीच उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

Maharashtra Weather

Maharashtra Weather : देशभरात होळीनंतर उन्हाची तीव्रता वाढत असते, पण यंदा फाल्गुन मासातच सूर्य आग ओकत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सियसच्या उंबरठ्यावर मजल मारली असून, उन्हाचा तडाखा अधिकच जाणवू लागला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Maharashtra Weather तापमान वाढ, पण पावसाचीही शक्यता!

भारतीय हवामान विभागानुसार (IMD), सध्या देशाच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच, पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 23 आणि 24 फेब्रुवारीला तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather: मुंबई, पुण्यात उन्हाचा कडाका!

राजधानी मुंबईत उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र होत आहे. शनिवारी शहरातील कमाल तापमान 37 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले, तर कुलाब्यात 35 अंश आणि ठाण्यात 37 अंश तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, पुण्यातही तापमान झपाट्याने वाढत आहे. शनिवारी शिवाजीनगर येथे 36.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर तळेगाव आणि कर्जतमध्ये 38 अंशांपर्यंत पारा गेला.

आगामी हवामानाचा अंदाज:

  • 23 व 24 फेब्रुवारी: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
  • मुंबई, पुणे, नागपूर: तापमान वाढ कायम राहणार, उन्हाचा चटका जाणवणार.
  • कोकण आणि विदर्भ: शुष्क हवामान, उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

सावधगिरीची गरज!

हवामान बदलांमुळे उष्णतेच्या झळांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी पुरेसा पाणी सेवन करावे, हलका आहार घ्यावा आणि शक्यतो दुपारच्या वेळेस घराबाहेर जाणे टाळावे.