मनसेचे पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ विरोधात चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध !

"MNS Protests in Nashik by Burning Posters of Pakistani Actor Fawad Khan's Film 'Legend of Maula Jatt'"

नाशिक रोड प्रतिनिधी: पाकिस्तानने भारतावर २०१६ साली काश्मीर मध्ये उरी व २०१९ साली पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्या नंतर भारताचा सिने वर्कर्स अससोसिएशन यांनी पाकिस्तानी कलावंतांना भारतात बंदी घातली होती परंतु बंदीला झुगारून फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होत आहे, चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर वायरल झालेली पोस्ट द्वारे दिल्या नंतर मनसेचे नाशिकरोड येथे रेजिमेंटल मल्टिप्लेक्स सिनेमा थेटर समोर पाकिस्तानी अभिनेत्याचा व चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला व चित्रपट देशात व महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचा व खळ खट्याक चा इशारा मनसेने नाशिक मधील सर्व मल्टिप्लेक्स ला दिला व “पाकिस्तानी अभिनेत्याचे चित्रपट कसे प्रदर्शित करता , तेच बघतो आम्ही ! ” असा फलक देखील झळकावला

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या वेळी शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित, उपजिल्हा अध्यक्ष संतोष सहाणे व मनोज घोडके , कार्यकारणी सदस्य शशी चौधरी , मनविसे चे उपजिल्हा अध्यक्ष नितीन धानापुणे, चित्रपट सेनेचे निखिल सरपोतदार ,भानुमती अहिरे , आदित्य कुलकर्णी , रंजन पगारे , स्वप्नील सहाणे , मयूर रत्नपारखी , वैभव शिंदे उपस्थित होते

Leave a Reply