Shocking Minor girl rape case Nashik: 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम गजाआड

Minor girl rape case Nashik

गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची जलद आणि अचूक कारवाई

Minor girl rape case Nashik:
गंगापूर रोड परिसरात अवघ्या ४ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास केवळ २४ तासांत अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, या कामगिरीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


घटनेचा तपशील : आरोपीने इंद्रायणी कॉम्प्लेक्समध्ये केला अत्याचार (Minor girl rape case Nashik)

१६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ ते ३ दरम्यान गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डनच्या मागे असलेल्या इंद्रायणी कॉम्प्लेक्स येथे कृष्णा भानुदास उफाडे (वय २१) या नराधमाने शेजारी राहणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीवरून भादंवि कलम ३७६, ३७६(२)(एफ) आणि पॉक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांची जलद कारवाई : २४ तासांत आरोपीला अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी तत्काळ अटकेचे आदेश दिले.

पोलिस नाईक प्रशांत मरकड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी कॅनडा कॉर्नर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा युनिट क्र. १ ने १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६:४५ वाजता अहिरराव फोटो स्टुडिओसमोर आरोपी कृष्णा उफाडेला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.


कारवाईतील सहभागी अधिकारी व कर्मचारी

ही धडक कारवाई पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  • पोलीस आयुक्त: संदीप कर्णिक
  • पोलीस उपायुक्त (गुन्हे): प्रशांत बच्छाव
  • सहाय्यक पोलीस आयुक्त: संदीप मिटके
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक: मधुकर कड
  • सहभागी अधिकारी/कर्मचारी: हिरामण भोये, रविंद्र बागुल, चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, प्रविण वाघमारे, रोहिदास लिलके, नाझीम पठाण, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, अमोल कोष्टी.