नाशिक रोड, प्रतिनिधी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
येथील गंधर्व नगरी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, शिखरेवाडी
मैदानाच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) केली आहे. नाशिक रोड अध्यक्ष अकिल काद्री यांच्या नेतृत्वाखाली महापालिका विभागीय अधिका-यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर दिलीप ठाकूर, सुभाष निकम, किशोर शिंदे, अंजुम शेख, अजित शेख, सदाशिव धुर्जड, कमलाकर गुंजाळ, संतोष गाडेकर, विरेंद्र महाले, गोकूळ बागूल,
निवेदनाचा आशय़ असा- उत्सव मंगल कार्यालया जवळील भोले मेडिकल चौक, शिखरेवाडी मैदान, आकार सोसायटी, शाहूनगर उद्यान, जिजामाता नगर येथील पुतळा परिसर या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. विद्यार्थी, नागरिक, महिलांमध्ये दहशत आहे. तसेच पावसामुळे शिखरेवाडी मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर चिखल झाला आहे. येथे मुरूम टाकावा, कच-यामुळे अस्वच्छता झाली आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. मैदानाची नियमित स्वच्छता करावी.