विसरवाडीतील गाईच्या पोस्टमार्टमसाठी गुगल पे व्दारे घेतली लाच
नंदुरबार एसीबी कारवाई : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे एका पशुवैद्यकिय अधिकाऱ्याला ३०० रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने (ACB) रंगेहात पकडले आहे. ही रक्कम गुगल पे व्दारे स्वीकारण्यात आली होती.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
हर्षल गोपाळ पाटील यांनी घेतली लाच (नंदुरबार एसीबी कारवाई)
शासकीय कामासाठी अतिरिक्त पैसे मागितले
विसरवाडी येथील श्रेणी १ चे पशुवैद्यकिय अधिकारी हर्षल गोपाळ पाटील (वय २९) यांनी तक्रारदाराच्या मयत गाईचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करून देण्यासाठी १५० रुपये शासकीय फी घेतल्यानंतर, अधिक ४०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर त्यांनी गुगल पे व्दारे ३०० रुपये पंचांसमक्ष स्वीकारले.
तक्रार आणि कारवाई
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
तक्रारदाराच्या गाईचा विमा असल्याने शवविच्छेदन आवश्यक होते. या प्रक्रियेसाठी लाच मागण्यात आल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडले.
सापळा कारवाईत सहभागी अधिकारी
- सापळा अधिकारी: नेहा तुषार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, नंदुरबार
- सापळा पर्यवेक्षण अधिकारी: श्री. राकेश चौधरी, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, नंदुरबार
- सापळा पथकातील सदस्य: नरेंद्र खैरनार, विलास पाटील, हेमंत महाले, विजय ठाकरे, देवराम गावित, संदीप खंडारे, जितेंद्र महाले, सुभाष पावरा
गुन्हा दाखल
विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीने केलेल्या या यशस्वी कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.