भारताला स्वतंत्र होऊन 78 वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु देशातील महिलांची सुरक्षा आजही मोठा प्रश्न आहे. या संदर्भात “अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती”च्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
“राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत” आणि समितीच्या इतर सदस्यांनी, विशेषतः अरुणाताई मातंग, राजश्रीताई गायकवाड, शेफालीताई शर्मा, हसीना शेख मॅडम, रोहिणी ताई वाघ, आणि शफाक मोमीन यांच्यासह, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलांच्या असुरक्षिततेविषयी तक्रार केली.
महिलांवरील अत्याचार आणि त्यातून होणारे हत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. प्रशासनाने महिलांना सुरक्षिततेची गारंटी देणारी नियोजनशील पद्धतीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उपाध्यक्ष अरुणाताई मातंग यांनी या प्रश्नांना दुजोरा देत प्रशासनाकडे दोन प्रमुख मागण्या केल्या:
- महिलांच्या कामकाजाच्या वेळा: महिलांनी संध्याकाळी सातच्या आत काम संपवावे किंवा नाईट शिफ्टमध्ये असलेल्या महिलांनी सात वाजेपासून पुढे सकाळपर्यंत काम करावे, त्यामुळे महिलांना घर आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची खात्री मिळेल.
- जात पडताळणी आणि खराब रस्ते: जात पडताळणी प्रक्रियेतील अडचणी आणि खराब रस्त्यांच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी.
यावर संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी उपाध्यक्ष अरुणाताई मातंग, शहर संघटक रमेश चेवले, नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी संजय बलकवडे, देवळाली कॅम्प प्रतिनिधी पंडित चंद्रमोरे, श्याम डावरे, नाशिक शहर सदस्य संतोष साबळे, जीवन ठुबे, शेफाली शर्मा, हसीना शेख, शफाक मोमीन, मोबीन सय्यद, रोहिणी वाघ, राजश्री गायकवाड, राजू शिरसाट, आणि विक्रांत भालेराव उपस्थित होते.
महिलांच्या सुरक्षेची समस्या समाधानाच्या मार्गावर आल्याची आशा आहे, असे समितीने सांगितले.