नाशिक (वणी) Nashik Accident News : वणी-सापुतारा महामार्गावर गुरुवारी (दि. १५) सकाळी भीषण अपघात झाला. दोन दुचाकींच्या धडकेत एका २५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत महिला –
माधुरी मनोज देशमुख (वय २५, रा. वडपाडा, ता. सुरगाणा)
अपघाताची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज देशमुख हे पत्नी माधुरी यांच्यासोबत मुलाला भेटून वणीच्या दिशेने दुचाकीवरून परत येत होते. अंबानेर फाट्याजवळ त्यांच्या गाडीला मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली.
या अपघातात मागे बसलेल्या माधुरी देशमुख यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती मनोज देशमुख किरकोळ जखमी झाले आहेत.
धडक देणारी दुचाकी चालवणारे नारायण काशिनाथ रक्ते (वय ४०, रा. नाशिक) हेही गंभीर जखमी झाले असून ते पांडाणे येथील आश्रमशाळेत शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समजते. दोन्ही जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांचा प्रतिसाद (Nashik Accident News)
या दुर्दैवी घटनेमुळे वणी-सापुतारा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.