15 August Flag Hoisting Nashik : मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजनच करणार नाशिकमध्ये ध्वजारोहण; भुसे-भुजबळांवर पुन्हा भारी

15 August Flag Hoisting Nashik: Girish Mahajan, a trusted minister of Chief Minister Fadnavis, will hoist the flag in Nashik; Heavy on Bhuse-Bhujbal again

Nashik News | 15 August Flag Hoisting Nashik – नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही सुटलेला नसताना १५ ऑगस्टला होणाऱ्या ध्वजारोहणावरून राजकीय पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे मंत्री छगन भुजबळ आणि शिंदे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यात झेंडावंदनाचा मान कोणाला मिळणार याची चुरस होती.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपल्या विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांनाच ध्वजारोहणासाठी पसंती दिली असून, याबाबतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. यामुळे भुसे व भुजबळांवर महाजन पुन्हा भारी पडले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पालकमंत्रिपदावरून वाद कायम

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आठ महिन्यांपासून स्थगित आहे. सुरुवातीला भाजपकडे हे पद असताना, शिंदे गटाने भुसे यांना संधी द्यावी अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार आणि तीन मंत्री असल्याने, भुजबळ यांनाही दावा होता. याआधी 26 जानेवारी आणि 1 मे रोजीचा झेंडावंदनाचा मानही गिरीश महाजन यांनाच मिळाला होता.

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे महत्त्व वाढले (15 August Flag Hoisting Nashik)

आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026 मुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचे महत्त्व अधिक वाढले आहे. सध्या महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून काम पाहत असल्याने, पुन्हा ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने पालकमंत्रिपद भाजपकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.