Nashik Accident News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात – ट्रॅक्टर 200 फूट दरीत कोसळला; दोन महिला ठार, 9 जखमी

Nashik Accident News: Terrible accident while returning from Devdarshan – Tractor falls into 200 feet ravine; Two women killed, 9 injured

नांदगाव (नाशिक) Nashik Accident News: पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. जातेगाव पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर २०० फूट दरीत कोसळल्याने दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. १७) घडला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांची नावे

  • कांताबाई नारायण गायके (वय ५६)
  • कमलबाई जगदाळे (वय ६२)

या दुर्दैवी घटनेमुळे संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव गावावर शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती

संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव (ता. कन्नड) येथील भाविक ट्रॅक्टरने जातेगाव येथे पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन आटोपून परतत असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट २०० फूट खोल दरीत कोसळले.

या अपघातात दोन्ही महिला जागीच ठार झाल्या, तर चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले आणि आदित्य योगेश कवडे हे नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मदतकार्य व पोलिस कारवाई (Nashik Accident News)

अपघाताची माहिती मिळताच तेथे उपस्थित पर्यटकांनी धैर्य दाखवत दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नांदगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.