Nashik : एटीएम मशीनमध्ये छेडछाड करणाऱ्या गुन्हेगारास अंबड पोलिसांनी (Ambad Police) घेतले गजाआड

नाशिकमधील अंबड पोलिसांनी एटीएम मशीनमध्ये छेडछाड करणाऱ्या एक गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीने एटीएम मशीनमध्ये अवैधपणे छेडछाड केली होती, ज्यामुळे नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. अंबड पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Nashik : एटीएम मशीनमध्ये छेडछाड, कार्डची अदलाबदल आणि स्किमर लावून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीस अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik अंबड पोलीस ठाण्यात फिर्यादी वैभव सुभाष सोनजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधानाच्या कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(क) व (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीनुसार, आरोपी सलमान रिझवान खान (वय २१ वर्षे, मूळ रा. उत्तरप्रदेश) हा दत्तचौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपीला अटक केली.

प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपासात पोलिसांनी बुध्दी कौशल्याचा वापर करत आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळवली आहे.

या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी मार्गदर्शन केले.

आरोपीला न्यायालयाने १२ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ करत आहेत.

He Pan Wacha : Vidhansabha : विधानसभा तिकीट खंडणीप्रकरण; 50 लाख मागणारे दोन दिल्लीतील आरोपी अटकेत