संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik Athletics Championship: क्रीडाप्रेमींना व उत्साही युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक अॅथलेटिक्स फाउंडेशनतर्फे २६ आणि २७ एप्रिल २०२५ रोजी तिसरी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र पोलिस अकॅडमी, नाशिक येथील अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकवर पार पडणार आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये Nashik Athletics Championship
क्रीडा प्रकारांचा समावेश
या स्पर्धेत धावणे (Running), उड्या (Jumping) आणि फेक (Throwing) या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना संधी देण्याचा उद्देश या स्पर्धेमागे आहे.
वयोगटानुसार स्पर्धा (Nashik Athletics Championship)
स्पर्धेमध्ये ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुले व मुली, तसेच खुल्या गटातील खेळाडूंना सहभागाची संधी आहे. ही स्पर्धा नवोदित आणि प्रशिक्षित खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याची उत्तम संधी ठरणार आहे.
प्रमुख आयोजक व मार्गदर्शक (Nashik Athletics Championship)
या उपक्रमाबाबत माहिती देताना सचिव मंगेश राऊत, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन रामदास मुखेकर आणि नाशिक अॅथलेटिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मुस्तफा टोपीवाला यांनी सांगितले की, “ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून, नाशिक शहराच्या क्रीडा प्रगतीचे प्रतीक ठरेल.”
संपर्क व सहभागासाठी माहिती
राज्यभरातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहभाग इच्छुकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
Secretary – Mangesh Raut +91 87675 50244
- 70578 38845
- 93715 03100