Nashik: 69 टवाळखोरांना दणका, वाहतूक नियम तोडणाऱ्यांवरही कारवाई
Nashik – शहरातील कॉलेज रोड परिसरात दुपारी 12वीच्या परीक्षा सुटण्याच्या वेळी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून टवाळखोर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. या मोहिमेत 69 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली असून, अनेक वाहनचालकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik पोलिसांची धडक मोहीम – आकडेवारी स्पष्ट!
ही मोहीम पोलीस निरीक्षक नितीन जाधव आणि पोनि राजपूत (गंगापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात विविध वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली:
✅ टवाळखोरांवर कारवाई: 69
✅ स्टॉप अँड सर्च (वाहन तपासणी): 112
✅ ट्रिपल सीट वाहन चालक: 13
✅ विना कागदपत्रे वाहन: 06
✅ इतर वाहतूक नियमभंग प्रकरणे: 04
नियम तोडणाऱ्यांवर सातत्याने कारवाई – पोलिसांचा इशारा!
शहरातील वाढती टवाळखोरी आणि वाहतूक शिस्तभंग रोखण्यासाठी पोलिसांकडून अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. शिस्तबद्ध वाहतूक आणि सुरक्षितता याला प्राधान्य देण्यासाठी नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
➡ नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि शहरातील सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
He Pan Wacha : Sandeep Karnik : सोनसाखळी चोऱ्यांचा पर्दाफाश; ‘मोक्का’तर्गत तीन टोळ्यांवर कारवाई