Nashik Crime News : फेसबुकवरून ओळख वाढवून 3.25 लाखांचे दागिने लंपास – भगूरमधील वृद्ध महिलेला बहुरुपी भिडेची फसवणूक

Nashik Crime News: Jewelry worth 3.25 lakhs stolen by increasing identity on Facebook – Elderly woman in Bhagur cheated by multi-rupee fraudster

नाशिक (Nashik Crime News) : भगूर (Bhagur) परिसरात एक धक्कादायक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. बनावट फेसबुक प्रोफाईलच्या (Fake Facebook Profile) माध्यमातून ६० वर्षीय महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन करणाऱ्या एका बहुरुपी फसवणूक करणाऱ्याने (Fraudster Vinay Bhide) तब्बल ३.२५ लाख रुपयांचे दागिने (Jewellery Fraud) घेऊन पोबारा केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

फेसबुकवरून ओळख, प्रत्यक्षात घरात शिरकाव

भगूर बसस्थानकाजवळ वास्तव्यास असलेल्या एका वृद्ध महिला साडी-कापड विक्रीचा व्यवसाय करतात. तिचा पती आजारी असून ‘बेडरेस्ट’ आहे. काही दिवसांपूर्वी विनय भिडे नावाच्या व्यक्तीने बनावट प्रोफाईलवरून फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. संवाद वाढल्यानंतर व्हॉट्सॲप व मोबाईलवर संवाद सुरू झाला.

३१ जुलै रोजी प्रत्यक्ष घरी पोहोचला संशयित

विनय भिडे हा ३१ जुलै रोजी थेट महिलेच्या घरी आला. घरात तिचा पती, नणंद आणि मोलकरीण होते. त्यांनी त्याला ओळख मानून प्रवेश दिला. काही वेळ गप्पा मारल्यानंतर भिडेने महिलेच्या दागिन्यांवरून सांगितले की, “हे जुने झाले आहेत, मी नवीन पॉलिश करून देतो.” विश्वासाने महिलेने अंगावरील व घरातील ३.२५ लाखांचे दागिने त्याच्या हवाली केले.

“२ तासांत परत करतो” म्हणणारा ३ तासांतही परतला नाही (Nashik Crime News)

भिडेने दोन तासात परत येण्याचे सांगून निघून गेला. मात्र तीन तास उलटूनही न आल्याने महिलेच्या शंका वाढल्या. मोबाईल बंद, फेसबुक प्रोफाईल गायब! महिलेने तत्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस तपास सुरू, सीसीटीव्ही फूटेजमधून ओळख पटवण्याचा प्रयत्न

वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण देवरे तपास करत असून, घरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे फसवणूक करणाऱ्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सतर्कता महत्त्वाची – अनोळखी सोशल मिडिया प्रोफाईलवर विश्वास ठेऊ नका

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चिंता पसरली असून, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी ओळखीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. हिंदी मालिकांप्रमाणे घडलेली ही सत्य घटना आता चर्चेचा विषय बनली आहे.