Nashik Drug Seized : नाशिकरोडमध्ये घरातून पावणेदोन लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

Nashik Drug Seized: MD drugs worth Rs. 2.5 lakh seized from a house in Nashik Road

Nashik Crime News | Nashik Road Drugs Seized | Nashik Drug Seized
नाशिकरोड : जय भवानी रोड परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने (Anti Narcotics Squad) मोठी कारवाई केली. या कारवाईत घरातून तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून चौघांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातच सापडला एमडीचा साठा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुकदेव सोनवणे (३९, रा. मराठा निवास, जय भवानी रोड, फर्नांडिसवाडी) याच्याकडे एमडी ड्रग्ज असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या दरम्यान, ३४ ग्रॅम वजनाचे सुमारे १.७५ लाख रुपयांचे एमडी (Mephedrone Drug) आढळून आले.

एमडी जप्त करताच पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत सोनवणे याने हा माल स्टेफन भाई (रा. वाशी), रोहित नेहे (रा. विहितगाव) व कैफ पठाण (रा. सिन्नर फाटा) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल (Nashik Drug Seized)

या प्रकरणी पोलिस हवालदार बळवंत गोविंद कोल्हे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वायकर करीत आहेत.