Shocking Nashik gold snatching news : नाशिकमध्ये धक्का: वृद्ध महिलेच्या गळ्यातील ₹ 1.2 लाखांचे मंगळसूत्र लंपास

Nashik gold snatching news

छान हॉटेल परिसरात घटना, मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik gold snatching news – दवाखान्यातून तपासणी करून परतत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना छान हॉटेल परिसरात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

घटनेचा तपशील (Nashik gold snatching news)

फिर्यादी कल्पना प्रमोद बाविस्कर (वय ६४, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) या आपल्या पतीसह विनयनगर परिसरातील दवाखान्यात गेल्या होत्या. तपासणी झाल्यानंतर सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्या महामार्गाकडे पायी परतत असताना ही घटना घडली.

नाईन पल्स हॉस्पिटल कडून त्या छान हॉटेलच्या दिशेने असलेल्या कच्च्या रस्त्यावरून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्याजवळ आले आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून Nashik gold snatching पसार झाले.

पोलिस तपास सुरू (Nashik gold snatching news)

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार गाढवे करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


दुचाकीत चॉपर घेवून फिरणा-या युवकाला अटक

अंबड पोलीसांची कारवाई, धारदार चॉपरसह दुचाकी जप्त

दुचाकीत चॉपर ठेवून फिरत असलेल्या एकाला अंबड पोलीसांनी अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून धारदार चॉपरमोपेड दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

संशयिताची माहिती

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राजेश अंकुश डोंगरे (रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार) असे आहे. एमआयडीसी पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

सोमवारी (दि. १४) सायंकाळी पोलिसांनी त्यास अडवून अंगझडती घेतली असता डिक्कीत धारदार चॉपर आढळून आला. याप्रकरणी अंमलदार अर्जुन कांदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सुरू

सदर प्रकरणाचा तपास हवालदार टोपले करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याचे पूर्वीचे गुन्हे तपासले जात आहेत.