Nashik : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, ननाशी (तालुका दिंडोरी) गावात खळबळजनक घटना घडली. 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास, पिता-पुत्रांच्या जोडीने भर वस्तीत एका व्यक्तीची निर्घृण हत्या केली आणि थेट त्याचे मुंडके घेऊन पोलीस चौकीत दाखल झाले. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून नागरिकांनी ही क्रूरता उघडपणे पाहिली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
हत्येचे कारण:
संशयित आरोपी सुरेश बोके आणि त्याचा मुलगा रामदास उर्फ रामड्या बोके यांनी गुलाब वाघमारे याच्यावर त्यांच्या मुलीला पळून जाण्यास मदत केल्याचा संशय घेतला. या कारणावरून त्यांनी कु-हाड आणि कोयत्याने गुलाब वाघमारे याच्या मानेवर वार करून त्याचे शिर धडापासून वेगळे केले. हत्येनंतर आरोपींनी पोलीस चौकीत जाऊन “आम्ही त्याचा कायमचा काटा काढला, आता तुम्हाला काय करायचे ते करा,” असे म्हणत पोलिसांना आव्हान दिले.
Nashik पोलिस कारवाई:
मयताची पत्नी मिनाबाई वाघमारे यांनी पेठ पोलीस ठाण्यात सुरेश आणि रामदास बोके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक डी. एम. गोदंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून गावात तणावाचे वातावरण पाहता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.