नाशिकमध्ये अनधिकृत कॅफेवर पोलिसांचा छापा
Nashik illegal café raid : नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी शहरातील एका अनधिकृत कॅफेवर कारवाई करत कॅफेचालकांना अटक केली आहे. सोसायटीच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या ‘मोगलीज कॅफे’ मध्ये तरुण जोडप्यांसाठी आडोसा उपलब्ध करून दिला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik illegal café raid : अटक झालेले कॅफेचालक कोण?
अटक करण्यात आलेल्या दोघा कॅफेचालकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- आकाश ए. बच्छाव (२७, रा. बोरगड)
- आदित्य सी. सोनवणे (२८, रा. म्हसरुळ)
कॅफेतील अनैतिक कृत्ये आणि आरोग्य धोक्यात टाकणारे वातावरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी कॅफेत अश्लील कृत्यांसाठी पडदे टाकून अंधुक प्रकाश ठेवला होता. भिंतींवर अश्लील पोस्टर्स, पेटिंग आणि प्रेमभावना दर्शवणारे लिखाण करण्यात आले होते. यामुळे कॅफेतील वातावरण सार्वजनिक आरोग्यास अपायकारक असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
सुरक्षेचा अभाव आणि गंभीर गुन्हा दाखल
कॅफेत आग लागल्यास पर्यायी मार्ग नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकला असता. याच कारणास्तव दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न (IPC 307) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
महापालिकेची कारवाई – अनधिकृत कॅफेवर बंदी?
नाशिक महानगरपालिकेने या अनधिकृत कॅफेविरोधात सक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ‘मोगलीज कॅफे’ बंद करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या इतर कॅफेवर देखील महापालिका कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कॅफेचालकांमध्ये खळबळ
या घटनेनंतर नाशिकमधील इतर कॅफेचालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे अशा अनधिकृत आणि असामाजिक कॅफेवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.