कुंभमेळ्यासाठी महत्त्वाच्या स्थळांची पाहणी
Nashik Kumbh Mela 2027 : नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचवटी विभागातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कुंभमेळ्यासाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महत्त्वाच्या विकासकामांवर भर
पाहणी दरम्यान, कुंभमेळ्यासाठी महत्त्वाच्या विकासकामांची यादी निश्चित करण्यात आली. सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले.
मुख्य विकास प्रकल्प: (Nashik Kumbh Mela 2027)
१. साधूग्राम ते रामकुंड अमृत मिरवणूक मार्ग सुधारणा
- काँक्रीट रस्त्यांचे नूतनीकरण व रुंदीकरण
- रस्त्यालगत रामायणकालीन भित्तीचित्रांचे सुशोभीकरण
- अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे हटविणे
२. भाजी मार्केट पुनर्विकास व स्थलांतर
- नदीघाट परिसरातील भाजीबाजाराचे स्थलांतर
- गाडगे महाराज पुलालगत अमृत मिरवणुकीसाठी डाऊन रॅम्प बांधणी
३. वाघाडी नदी सुशोभीकरण व प्रवाह नियोजन
- नदीतील सांडपाणी प्रवाह अडवून वळविणे
- वाघाडी नदीच्या काठावर व्ह्यू कटर भिंत आणि पर्यावरणपूरक सुशोभीकरण
४. भाविक शाही मार्ग आणि पादचारी पूल
- टाळकुटेश्वर पुलाजवळ सांडवा पूल उभारणी
५. वाहतूक आणि पूल सुधारणा
- भिकूसा पेपर मिल येथे नवीन पूल सुरू करण्यासाठी MSEB खांब स्थलांतर
- NIT कॉलेज ते हिरावाडी रोड पूलासाठी मिसिंग लिंक संपादन
भाविक ग्राम आणि सांस्कृतिक उपक्रम
- मिनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी नाट्यगृह आणि महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर भाविक ग्राम व टेंट सिटी उभारणी
- रामकथा स्टेज शो आणि डिजिटल म्युझियम आयोजन
वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थापन
- ई-रिक्षा आणि मोटारसायकल सेवा सुरू करणे
- शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे वाहनतळ विकसित करणे
आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा उपाययोजना
- संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे
- गर्दी नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा आणि सुरक्षा उपाय लागू करणे
नाशिक कुंभमेळा २०२७ साठी ठोस नियोजन
नाशिक महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने कुंभमेळ्यासाठीचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, सुरक्षा आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा यावर विशेष भर दिला जात आहे.
कुंभमेळा २०२७ हे नाशिकसाठी एक भव्य आयोजन ठरणार असून, प्रशासन वेळेत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.