नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गासाठी २०२४-२५ मध्ये सानुग्रह अनुदान जाहीर, २० हजार रुपये मिळणार
नाशिक महानगरपालिकेने (nashik Mahanagarpalika) आपल्या कर्मचारी वर्गासाठी मोठा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दीपावली सणानिमित्त कर्मचारी वर्गाला सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महानगरपालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी मागील काही महिन्यांपासून सानुग्रह अनुदान वाढवण्याची मागणी करत होती. २५ ते ३० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी कर्मचारी संघटनांची मागणी होती.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मागील वर्षाच्या तुलनेत १७.५ टक्के वाढ
महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संघटनांच्या मागण्यांचा विचार करत आणि मनपाच्या आर्थिक स्थितीचे निरीक्षण करून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अनुदानामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२-२३ या वर्षात कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर, २०२३-२४ साठी या रकमेवर २ हजार रुपयांची (११.३३ टक्के) वाढ करून एकूण १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.
यंदाच्या वर्षासाठी ३ हजार रुपयांची वाढ
२०२४-२५ या आर्थिक वर्षात, १७ हजार रुपयांवर ३ हजार रुपयांची वाढ (साधारणतः १७.५ टक्के वाढ) करून एकूण सानुग्रह अनुदानाची रक्कम २० हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासनाच्या अनुदानातून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
कर्मचारी वर्गाची मागणी आणि निर्णय
महानगरपालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी सानुग्रह अनुदान वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. २५ ते ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी संघटनांनी केली होती. मात्र, महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, प्रशासनाने २० हजार रुपयांपर्यंतच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
या निर्णयामुळे नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. दीपावलीसारख्या मोठ्या सणाच्या निमित्ताने हे अनुदान मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निर्णयाचा कर्मचारी वर्गाने स्वागत केले असून, दीपावलीसाठी आर्थिक सुबत्ता येईल, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.