सोनलाल भंडारी यांच्या यशस्वी कार्यकाळानंतर जबाबदारीची नवी धुरा
नाशिक : नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने (Nashik Merchant Co-operative Bank) गेल्या दीड वर्षात तब्बल 65 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. या यशस्वी वाटचालीनंतर अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करत मावळते अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनी नूतन अध्यक्ष हेमंत धात्रक यांच्याकडे जबाबदारी सोपवली. 1959 साली स्थापन झालेल्या या बँकेने आता आर्थिक व सामाजिक क्षेत्रात ‘वटवृक्ष’ बनण्याचा टप्पा गाठला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अध्यक्षपदासाठी हेमंत धात्रक यांची बिनविरोध निवड
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अनुभवाचा उपयोग
स्वर्गीय हरिभाऊ धात्रक यांचा वारसा पुढे नेताना हेमंत धात्रक हे व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचेही नेतृत्व करत आहेत. बँकेच्या आर्थिक विकासात गती आणत 5 हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठण्याचा निर्धार त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
विशेष कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
सातपूर येथील मुख्य शाखेत निवडीची औपचारिक घोषणा
नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या(Nashik Merchant Co-operative Bank) सातपूर येथील मुख्य शाखेत मावळते अध्यक्ष भंडारी यांनी धात्रक यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, वसंत गीते, जयंत जायभावे, कोंडाजी मामा आव्हाड, गुरुमीत बघा, दिगंबर गीते, दत्ताजी गायकवाड, कमलेश बोडके, प्रकाश घुगे, भूषण घुगे, शिवाजी चुंबळे, सुरेश पाटील, लक्ष्मण जायभावे, सुनील चोपडा, रोहिणी नायडू यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बिनविरोध निवड ही परंपरा जपली
या बँकेच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून, यावेळीदेखील पॅनलचे प्रमुख वसंत गीते, सोनलाल भंडारी, विजय साने यांच्या नेतृत्वात धात्रक यांची एकमुखाने निवड झाली.
प्रमुख पदाधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती
कार्यक्रमास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीक्षित, जनसंपर्क संचालिका सपना बागमार, संचालक प्रकाश दायमा, महेंद्र बुराड, ललित मोदी, आकाश छाजेड, रंजन ठाकरे, गणेश गीते, नरेंद्र पवार, भानुदास चौधरी आणि बँकेचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.