Nashik News | बिर्‍हाडचे वादळ आज आदिवासी आयुक्तालयावर धडकणार; शिक्षक भरतीविरोधात आंदोलन तीव्र (सोमवार, दि. 16)

Nashik News | Birhad storm will hit tribal commissionerate today; Agitation against teacher recruitment intensified

नाशिक (Nashik News) : आदिवासी विकास विभागात खासगी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या शिक्षक भरतीच्या निर्णयाविरोधात राज्यातील कंत्राटी शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सोग्रस फाट्यावरून निघालेला ‘बिर्‍हाड मोर्चा’ आज (सोमवार, दि. १६) नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयावर धडकणार आहे.

डॉ. अशोक उईके यांच्याशी बैठक; मोर्चाकडे लक्ष

Nashik News – आज दुपारी ४ वाजता आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत या मोर्चावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री आंदोलनकर्त्यांनी ओझर येथील जनार्दन स्वामी मठात मुक्काम केला होता.

1791 शिक्षक भरतीचा निर्णय वादात

आदिवासी विकास विभागाने २१ मे २०२५ रोजी 84.74 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीसह 1,791 शिक्षकांच्या भरतीचा निर्णय घेतला. मात्र, या भरतीसाठी खासगी कंपनीची नेमणूक करण्याचा निर्णय कंत्राटी शिक्षकांच्या भविष्यावर घाला घालणारा ठरल्याने असंतोष उफाळून आला आहे.

राज्यभरातील कंत्राटी शिक्षक आक्रमक

राज्य रोजंदारी वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचारी संघटनेने यासंदर्भात सरकारविरोधात मोर्चा उभारला असून, शिक्षक भरती रद्द झाल्याचे अधिकृत पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे. संघटनेचे पदाधिकारी म्हणतात, “भरती रद्दीकरणाचा लेखी आदेश आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.

ओझरमध्ये घोषणाबाजी, नाशिकमध्ये तणावाची शक्यता

मोर्चाने रविवारी ओझर येथे घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. आज आयुक्तालयावर मोठ्या संख्येने आंदोलक जमा होणार असल्यामुळे नाशिक शहरात काही ठिकाणी वाहतूक व सुरक्षा यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.