नाशिक | १० जून २०२५
सुवासिनींसाठी आनंदाची बातमी — यंदा वटपौर्णिमा दोन दिवस साजरी केली जाणार आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळण्याची परंपरा असलेला हा सण महिलांना अधिक वेळ आणि सोयीने साजरा करता येणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
वटपौर्णिमा मुहूर्त 2025 — दोन दिवस का?
- मंगळवार (१० जून): पौर्णिमा साडेअकरा वाजेनंतर सुरू होईल. त्यामुळे सकाळी पूजन न करता दुपारी वटपूजन करण्याचा नियम आहे.
- बुधवार (११ जून): दुसऱ्या दिवशीही दुपारी १.१५ वाजेपर्यंत पौर्णिमा यथास्थित आहे. त्यामुळे महिलांना दुसऱ्या दिवशीही पूजेसाठी संधी उपलब्ध होईल.
ब्राह्मण व खगोल अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे की भद्रायोग असला तरी वटपूजन करता येते.
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व
सुवासिनी महिला वटवृक्षाला धागा बांधून, सात जन्मांसाठी पतीचे आरोग्य व दीर्घायुष्य यासाठी प्रार्थना करतात. हा व्रत सत्यवान-सावित्रीच्या प्रेमकथेवर आधारित आहे आणि विशेषतः महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक भागात मोठ्या श्रद्धेने पाळला जातो.
बाजारात गर्दी आणि आंब्यांचे दर वाढले
वटपौर्णिमेच्या पूजेत आंब्याचा उपयोग होत असल्यामुळे, आंब्यांचे दर वाढले आहेत. नाशिकमधील बाजारपेठांमध्ये सोमवार संध्याकाळपासूनच महिलांची आंबे, पूजेच्या वस्तू आणि भाज्यांसाठी खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
#वटपौर्णिमा2025
#वटपौर्णिमामुहूर्त
#वटपूजनकेव्हाकरायचं
#सुवासिनीव्रत
#वडपूजनमहत्व
#आंब्याचेदरवटपौर्णिमा
#वटपौर्णिमानाशिक2025
#WataPournima #pujamahiti