Onion Trader : नाशिक बस स्थानकावर धक्कादायक लूट: कांदा व्यापाऱ्याची लाखांची रोकड हिसकावली, एक चोरटा जेरबंद

mela bus satnad onion trader la lutale

नाशिक: शहरातील मेळा बस स्थानकात मंगळवारी सकाळी एका कांदा व्यापाऱ्याला (Onion Trader) लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अज्ञात टोळक्याने व्यापाऱ्याच्या ताब्यातील ११ लाख ६६ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावली. व्यापाऱ्याच्या आरडाओरडीनंतर प्रवाशांनी पाठलाग करत एका चोरट्याला पकडले, तर तीन साथीदार रोकड घेऊन फरार झाले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

घटनाक्रम:
कांदा व्यापारी (Onion Trader) विष्णू पाचोरे (वय ४८, रा. सिन्नर) मालेगाव तालुक्यातील उमराणे येथे कांदा खरेदीसाठी प्रवास करत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास ते मेळा बस स्थानकावर नाशिक-धुळे बसमध्ये चढले. त्यांच्या बॅगेत मोठी रोकड होती. बसमध्ये चढलेल्या चार ते पाच जणांनी गर्दीचा फायदा घेत व्यापाऱ्याच्या बॅगेतील पिशवी जबरदस्तीने हिसकावली.

घडलेल्या प्रकाराने पाचोरे यांनी आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी आणि स्थानकातील लोकांनी तात्काळ प्रतिसाद दिला. पाठलाग करत अन्वर मनियार (वय ४८, रा. उत्तर प्रदेश) या संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्याचे तीन साथीदार रोकड घेऊन पसार झाले.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बस स्थानकांवर चोरीच्या घटना घडत आहेत. गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरीचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. आता या घटनाक्रमात थेट लुटीचा प्रकार वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.