शहरातील ५७१ रुग्णालयांची तपासणी, ४५ रुग्णालयांत गंभीर त्रुटी आढळल्या
Nashik private hospitals inspection : नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील ५७१ खासगी रुग्णालयांची तपासणी केली असता ४५ रुग्णालयांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या रुग्णालयांना १५ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमभंग केल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik private hospitals inspection : मुख्य त्रुटी कोणत्या?
महानगरपालिकेच्या अहवालानुसार, तपासणीदरम्यान खालील त्रुटी आढळून आल्या:
- रुग्णहक्क सनद आणि दरपत्रक दर्शनी भागात नसणे – २७ रुग्णालये
- प्रदूषण नियंत्रण मंडळाची वैधता नसणे – १२ रुग्णालये
- अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसणे – ६ रुग्णालये
कोरोनाकाळात नियम लागू, पण नंतर अंमलबजावणी शून्य
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने २०२१ मध्ये महाराष्ट्र शूश्रुषा अधिनियमात सुधारणा करून दरपत्रक व रुग्णहक्क सनद लावणे बंधनकारक केले. परंतु, कोरोनाकाळ ओसरल्यानंतर अनेक रुग्णालयांनी हे नियम पाळले नाहीत.
नाशिक महानगरपालिकेची कडक भूमिका
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४५ खासगी रुग्णालयांना अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे.
“पंधरा दिवसांच्या मुदतीत त्रुटी दुरुस्त न केल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द केला जाईल.”
- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नाशिक महानगरपालिका
नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई होणार?
महानगरपालिका प्रशासन आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रुग्णांनी योग्य सेवा मिळावी यासाठी महापालिका प्रशासन कठोर पावले उचलणार आहे.