भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून बाबासाहेबांच्या अनुयायी येणार आहेत. रेल्वेने त्यांच्या प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी चोख व्यवस्था केली आहे. नाशिक रोड, मनमाड स्थानकांवरही चोख बंदोबस्त आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Railway मध्य रेल्वे ८ डिसेंबरपर्यंत १६ विशेष रेल्वे गाड्या चालवत आहे. ज्यात नागपूर ते मुंबई ८ गाड्या, दादर ते नागपूर दोन गाड्या, कलबुरगी-मुंबई दोन गाड्या, आदिलाबाद-दादर दोन गाड्या, अमरावती-मुंबई दोन गाड्या आहेत. ५ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या परळ-कुर्ला/ठाणे आणि कल्याण दरम्यान तसेच हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी/पनवेल सुरू राहतील.
दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने चोवीस तास मदत कक्ष सुरू राहील. येथे अतिरिक्त यूटीएस काऊंटर उघडण्यात आले आहेत. ७ डिसेंबरपर्यंत अनारक्षित तिकिटे आणि रेल्वे गाड्यांच्या चौकशीसाठी चैत्यभूमी येथे दोन यूटीएस-सह चौकशी काऊंटर असतील. या स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी दादर येथे २२३, सीएसटी येथे १६६, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १०५, ठाणे येथे १०३ आणि कल्याण येथे ७८ असे एकूण ६७५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दादर येथे आरपीफचे १२०, सीएसटी येथे ४०, कल्याण येथे ३० कर्मचारी तैनात आहेत. दादर येथे २५० आणि सीएसटी ८० रेल्वे पोलिस तैनात आहेत. त्यांच्या मदतीने विशेष तिकीट तपासणी पथके आरक्षित डब्यांमध्ये अधिकृत प्रवाशांनाच प्रवेश मिळवून देतील.
दादर येथील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे आणि मुंबई सीएसटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ८ मधील उपलब्ध जागेजवळ होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. दादर येथील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश/निर्गमन योजना आहे. दादर येथील गर्दी सुरळीत व्हावी यासाठी मध्य पूल आणि बीएमसी पुलावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. २१४ दिशादर्शक बॅनर लावण्यात आले आहेत.
मुंबई सीएसटी, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरील चौकशी कार्यालयाजवळ ट्रेन क्रमांक आणि विशेष गाड्यांच्या वेळा असलेले बॅनर/स्टँड लावले जातील.
संबंधित ठिकाणी पिण्याचे पाणी, वॉटर कुलर, स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, व्हील चेअर, स्ट्रेचर आणि भोजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
हे पण वाचा: Nashik Road: “डीआरएम इती पांड्ये यांचा घोटी-मनमाड रेल्वे मार्गाचा आढावा, प्रवासी सुविधांसाठी सुधारणा होणार”