सातपूर मधील प्रभाग क्रमांक ९ मध्ये नाशिक मनपा च्या वतीने अनेहमीत पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, विस्कळीत पाणी येण्याची वेळ आदी समस्या बाबत प्रभागातील महिलानी दि. ९ सप्टेंबर रोजी मा. सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या निवासस्थानाजवळील संपर्क कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.सातपूर विभागीय नाशिक मनपा कार्यालयात व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी व निवेदने देऊन देखील पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने महिलांनी मा. नगरसेवक दिनकर पाटील, याच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढल्याचे महिलांनी सांगितले.नाशिक महानगरपालिकेत प्रशासक लागल्यापासुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेली २० वर्षात कधीही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही. ती प्रशासक लागल्यापासुन समस्या निर्माण झालेली आहे.
सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने गंगापुर धरणातुन तसेच इतर धरणांतुन पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. प्रभाग क्र. ९ लगत दोन किलोमीटर वर गगापुर धरण, जलशुध्दीकरण केंद्र आहे. तरी प्रभागात शिवाजीनगर, कृष्ण मंदिर परिसरात पिण्यासाठी पाणी नाही हेच चित्र संपुर्ण नाशिक शहरात आहे.प्रभागात पाणी कमी वेळ येते व तेही कमी दाबाने येते. व्होलमनला विचारले असता जलकुंभातून जेवढे पाणी सोडले जाते तेवढेच मी सोडतो आधिका-यांना विचारले तर ते वेगळीच उत्तरे देतात. एकंदरीत सर्व सावळा गोधंळ सुरू असल्याचे आरोप भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अमोल पाटील यांनी केला आहे. पावसाळा असतांनाही आधिकारी आणि कर्मचा-यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. आधिका-यांना अनेक वेळा कळवुनही समस्या सोडवली जात नाही. अशी तक्रार सविता दहीवाड,सुंनंदा खैरनार,प्रमिला आहेर आदीसह इतर महिलांनी केली आहे. यावेळी सातपूर विभागीय पाणीपुरवठा अधिकारी रवींद्र पाटील यांना अमोल पाटील, मा. नगरसेवक लता पाटील व महिलांनी तक्रारी चे निवेदन दिले आहे
प्रभाग ९ मधील दोन दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा, लोकशाही मार्गान नाशिक महानगरपालिकेवर प्रभागातील महिलाना सोबतघेऊन हंडा मोर्चा काढण्याचा इशारा अमोल पाटील यांनी दिला आहे
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.