Monsoon Active in Nashik | हवामान विभागाचा अंदाज
नाशिक – Nashik Weather Update हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात रिमझिम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून पावसाचा जोर, जनजीवन विस्कळीत
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. यापूर्वी अवकाळी पावसाने आधीच मोठे नुकसान केले असताना, आता मान्सूनने सक्रिय होऊन शहर व ग्रामीण भागात पुन्हा हजेरी लावली आहे.
नांदगाव, येवला, त्र्यंबकमध्ये वीज पडली; काही घरांचे नुकसान
गेल्या 36 तासांत नांदगाव, येवला आणि त्र्यंबक तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून, वीज पडून काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. तसेच अनेक घरांची पडझड झाली असून शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
पुढील चार दिवस रिमझिम पावसाचा मुक्काम
मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील चार दिवस पावसाची सरी सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्र्या, रेनकोट तयार ठेवाव्यात, आणि ओढ्या–नाल्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.