नाशिक : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस ते गया दरम्यान नवीन साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक २२३५७ एलटीटी-गया सुपरफास्ट एक्सप्रेस २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक शुक्रवारी एलटीटीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०:५० वाजता गया येथे पोहोचेल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गया ते एलटीटी दरम्यान ट्रेन क्रमांक २२३५८ सुपरफास्ट एक्सप्रेस २३ ऑक्टोबरपासून दर बुधवारी गया येथून संध्याकाळी ७ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५:५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या स्थानकांवर थांबा असेल.
गाडीत प्रवाशांसाठी २२ एलएचबी कोच असणार आहेत, ज्यात १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास, ३ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी कोचचा समावेश आहे.