NMC : महापालिका निवडणुकीची तयारी; शिंदेसेनेत नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये हालचालींना वेग

IMG 20241229 124745

नाशिक: विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता महापालिका NMC निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, शिंदेसेनेत काही विरोधी पक्षांचे नेते, पदाधिकारी, आणि माजी नगरसेवक येण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मात्र, ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो, त्यांना पक्षात घेण्यापूर्वी विश्वासात घ्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.शिंदेसेनेची बैठक पार पडली.

या बैठकीत उपनेते विजय करंजकर आणि महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी महापालिका NMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणीसाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

महापालिका NMC निवडणुकीसाठी तातडीची कार्यवाही महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी सांगितले की, पक्षाच्या यशासाठी प्रत्येक प्रभागात सदस्य नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. महापालिका NMC निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत, याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.उपस्थिती आणि अनुपस्थितीवर चर्चाया बैठकीला उपनेते अजय बोरस्ते आणि त्यांचे समर्थक अनुपस्थित होते, ज्यामुळे चर्चा रंगली. बोरस्ते देवदर्शनासाठी गेले होते, तर काही पदाधिकारी वैयक्तिक कामामुळे अनुपस्थित राहिल्याचे तिदमे यांनी स्पष्ट केले.

नेत्यांकडून संघटन वाढविण्याचे आवाहनशालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे अभिनंदन करताना विजय करंजकर यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, आर. डी. धोंगडे, हर्षदा गायकर, भागवत आरोटे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

He Pan Wacha : Manisha Khatri “स्वच्छता, सुविधा आणि कुंभमेळा नियोजनावर आयुक्त खत्रींचा फोकस”