Nashik: पंचशिल नगरात जीवन ज्योत मेन्सन बंगला चोरट्यांनी फोडला – १८ हजाराचा ऐवज चोरी

Panchshil Nagarat Jeevan Jyot Mansion Bangla Chortyanni Phodla

Burglars Break Into Life Jyot Mansion in Panchshil Nagar

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पंचशिल नगर येथील भाजपा कार्यालयास लागून असलेल्या जीवन ज्योत मेन्सन बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी ५ ते २४ नोव्हेंबर दरम्यान बंगल्याचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चोरीत चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही, मात्र त्यांनी पितळी नळ आणि लोखंडी पाईप असा सुमारे १८ हजार रुपयांचा ऐवज लांबवला.

बंगल्याच्या मालक विजय बापूराव कुलकर्णी (६३) यांनी या घटनेची फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली. कुलकर्णी कुटूंबीय काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. घरात प्रवेश करणाऱ्या चोरट्यांनी दरवाजे व खिडकींच्या काचा फोडल्या, इलेक्ट्रीक वायरीग तोडून किचन आणि बेसिनचे नुकसान केले, तसेच बाथरूममधील नळाचे पितळी कॉक आणि लोखंडी नळ्या चोरीला घेतल्या.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून, सहाय्यक निरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.