घंटागाडी वेळेवर न आल्याने पंचवटी विभागात सर्वाधिक दंड
नाशिक Ghantagadi Complaint : शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. घंटागाडी (Ghantagadi Complaint) सेवेमधील अनियमिततेमुळे ठेकेदारावर एकूण ₹६७ लाख ८३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून यामध्ये सर्वाधिक ₹२५.८३ लाखांचा दंड पंचवटी विभागात झाला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
वेळेवर न येणं, अपुरी मनुष्यबळ आणि अनियमितता ठेकेदारांच्या अडचणीत कारणीभूत (Ghantagadi Complaint)
महापालिकेच्या ‘घंटागाडी आपल्या दारी’ या संकल्पनेतर्गत दररोज ७०० ते ८०० टन कचरा संकलन केला जातो. मात्र अनेक ठिकाणी ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ठेकेदारांकडून झालेली मुख्य चुकांची यादी:
- घंटागाडी वेळेवर न येणे
- २-३ दिवसांआडच सेवा उपलब्ध असणे
- नादुरुस्त वाहने
- आवश्यकतेपेक्षा कमी कामगार
- योग्य कचरा वर्गीकरण न करणे
- कचरा न उचलणे
या बाबींचा आढावा घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहा विभागांवर कारवाई केली आहे.
विभागानुसार दंडाचा तपशील
विभाग | दंड रक्कम (₹) |
---|---|
पंचवटी | २५,८३,३५० |
सातपूर | २१,१७,९५० |
नाशिक पूर्व | १७,४६,००० |
नाशिक पश्चिम | ९,४६,१०० |
नाशिकरोड | २,४०,२५० |
सिडको | ७,०८,००० |
महापालिकेचा स्पष्ट इशारा : गुणवत्तेमध्ये ढिलाई सहन केली जाणार नाही
महापालिकेकडून शहरातील ३१ प्रभागांमध्ये सुमारे २०० घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन होत असून, ठेकेदारांनी वेळेत आणि नियमानुसार सेवा दिली नाही, तर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.