लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Prithviraj Chavan : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीने जबरदस्त यश मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत परिस्थिती उलटली आणि महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला.
21 जिल्ह्यांत काँग्रेसचे खातेही न उघडले, फक्त 16 आमदार विजयी (Prithviraj Chavan)
राज्यात सर्वाधिक 13 खासदार असलेल्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. पक्षाचे फक्त 16 उमेदवार विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीतून नाराजी वाढू लागली आहे.
कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा (Prithviraj Chavan) दारुण पराभव
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य दावेदार समजले जाणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसलेंनी 38,545 मतांनी पराभव केला.
निकटवर्तीय प्रशांत चांदे भाजपमध्ये होणार दाखल
काँग्रेसला आणखी मोठा धक्का
चव्हाण यांचे निकटवर्तीय व काँग्रेसचे कराड शहर प्रमुख प्रशांत चांदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज दुपारी 3 वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चांदे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राजकीय समीकरणात मोठा बदल
प्रशांत चांदे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणे, म्हणजे काँग्रेससाठी आणि विशेषतः चव्हाण यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का ठरणार आहे.